पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – भोसरी येथील इंद्रायणीनगर येथे सिगारेटमध्ये गांजा भरून सार्वजनिक ठिकाणी त्याचे सेवन करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी पकडले आहे. १३ जून रोजी रात्री नऊ वाजता ही कारवाई करण्यात आली.दीपककुमार मनोजकुमार सिंग (वय २३, रा. धावडेवस्ती, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई गजानन विष्णू आढे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपककुमार हा गार्डनच्या परिसरात सिगारेटमध्ये गांजा भरून तो ओढत असताना आणि धूर हवेत सोडत असताना सापडला. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत
सिगारेटमधून गांजा ओढणारा तरुण ताब्यात
