पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – तडीपारीच्या आदेशाचा भंग करून हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई ओटास्किम मुस्लिम दफनभूमीजवळ शुक्रवारी (दि. १२ जून) रोजी रात्री साडेआठ वाजत करण्यात आली.
इम्तियाज उर्फ चिंट्या मुश्ताक शेख (वय २६, रा. ओटास्किम, निगडी) याला अटक केली आहे. पोलीस हवालदार लक्ष्मण छगन कोल्हे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला मार्च २०२५ मध्ये दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. तरीही त्याने शासनाची परवानगी न घेता हद्दीत प्रवेश केला आणि शस्त्रबंदी आदेशाचा भंग करत ३०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता बाळगल्याचे दिसून आले. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.
कोयत्यासह तडीपार गुंडाला अटक
