सिगारेटच्या वादातून पानटपरी चालकाला रॉडने मारहाण

पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – मुळशी तालुक्यातील लवळे फाटा येथे मागितलेली सिगारेट न मिळाल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ग्राहकाने पानटपरी चालकाला लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले.
समीर गोविंद थापा (वय १९, रा. पिरंगुट, ता. मुळशी) या पानटपरी चालकाने फिर्याद दिली आहे. अक्षय केळकर (वय २९, रा. दारुली, मुळशी) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या टपरीवर येऊन छोटी ॲडव्हान्स सिगारेट मागितली. फिर्यादीने छोटी सिगारेट उपलब्ध नसल्याने मोठी सिगारेट दिली. या गोष्टीचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत रॉडने डाव्या हातावर मारून जखमी केले. पुढील तपास बावधन पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *