पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गांजा बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. निगडी येथील ओटास्कीम परिसरात रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
पोलीस शिपाई विशाल रंगनाथ म्हस्के यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सनी शंकर थोरात (वय २०, रा. सहयोगनगर, त्रिवेणीनगर रोड, निगडी) या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री राजनगर ओटास्कीम येथील नॅशनल हेअर सलूनजवळ आरोपी संशयास्पदरित्या थांबला होता. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन हजार रुपये किमतीचा ४० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.
निगडीत गांजासह तरुणाला अटक
