निगडीत तरुणावर वस्तऱ्याने जीवघेणा हल्ला

पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – ‘आजीला काय बोलत होतास’ असे म्हणून एका तरुणावर वस्तऱ्याने गालावर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना निगडीतील मिलिंद नगर येथे शनिवारी (दि. १३ जून) रोजी रात्री दहा वाजताच्‍या सुमारास घडली.
साक्षी प्रकाश पोकळे (वय २१, रा. मिलिंदनगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. शेखर माने (वय २२), कमल उर्फ बाब्या बागवान (वय २१) आणि मिठ्ठया (वय २१, सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचा भाऊ ऋषिकेश जेवण करून गल्लीत फिरत असताना आरोपींनी त्यास गाठले व ‘तुला खूप मस्ती आली आहे का?’ असे म्हणून वाद घातला. या वादात कमल बागवान याने स्वतःजवळील वस्तऱ्याने ऋषिकेशच्या डाव्या गालावर वार केला, तर इतरांनी शिवीगाळ केली. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *