चालकाने केला १०.५४ लाखांच्या साहित्‍याचा अपहार

पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – ट्रान्सपोर्ट कंपनीत आयशर टेम्पोवर चालक म्हणून कामाला असलेल्या चालकाने कंपनीच्या १० लाख ५४ हजार ९२९ रुपये किमतीच्या फिनोलेक्स केबल बॉक्सचा अपहार केला. ही घटना ५ ते ७ मे दरम्‍यान ट्रान्‍सपोर्टनगर, निगडी येथे घडली.
विजय अशोकराव कुऱ्हे (वय ३८, रा. भोसले पगारिया टॉवर, फुगेवाडी) यांनी सोमवारी (दि. १५ जून) रोजी निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. अविनाश विजय चव्हाण (वय ३२, रा. शुभम पार्क, वराळे, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा चालक म्हणून कार्यरत असताना ट्रान्सपोर्टनगर निगडी ते लोहार चाळ, मुंबई या प्रवासादरम्यान आरोपीने टेम्पो (MH-14 KQ-3474) या टेम्‍पोतील फिनोलेक्स कंपनीचे केबल बॉक्स परस्पर लंपास केले. निगडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *