Mumbai-राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘गिग वर्कर्स सन्मान’ उपक्रम; मुंबई युवक काँग्रेसकडून मोफत पेट्रोल वाटप

मुंबई(mumbai) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने “गिग वर्कर्स सन्मान” उपक्रमांतर्गत मोफत पेट्रोल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा उपक्रम मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरिन आणि उत्तर मध्य मुंबई युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निखील रुपारेल यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे.

हा कार्यक्रम १९ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजता भारत पेट्रोलियम पंप, मुंबई विद्यापीठाशेजारी, कालिना कॅम्पस येथे होणार आहे. या उपक्रमांतर्गत अॅप-आधारित दुचाकी डिलिव्हरी सेवा देणाऱ्या गिग वर्कर्सना मोफत पेट्रोलचे वितरण करण्यात येणार आहे.

या उपक्रमाद्वारे गिग इकॉनॉमीतील कामगारांना दिलासा देण्याचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *