New Delhi-मोदींचं फ्रान्सच्या शाही हॉटेलमध्ये वास्तव्य! एका रात्रीचं भाडं ऐकून लागेल शॉक

नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्स दौऱ्यावर असून त्यांच्या मुक्कामासाठी निवडलेले ‘ले नेग्रेस्को’ (Le Negresco) हे आलिशान हॉटेल सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहे. हे हॉटेल फ्रान्समधील नीस (Nice) शहरातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेले असून आपल्या शाही वास्तुकला आणि ऐतिहासिक वैभवासाठी प्रसिद्ध आहे.

‘ले नेग्रेस्को’ हे केवळ हॉटेल नसून एक चालते-फिरते आर्ट म्युझियम मानले जाते. 1913 मध्ये सुरू झालेले हे हॉटेल 100 वर्षांहून अधिक जुना इतिहास जपते. गुलाबी घुमट असलेली ही भव्य इमारत, आत असलेले दुर्मिळ चित्रसंग्रह, शिल्पे आणि फ्रेंच ऐतिहासिक कलाकृती यामुळे हे ठिकाण जागतिक पर्यटकांचे आकर्षण ठरते. प्रत्येक खोलीची रचना वेगवेगळ्या थीमवर आधारित असून येथे वास्तव्यास राहणे म्हणजे एका राजवाड्यात राहण्याचा अनुभव असल्याचे सांगितले जाते.

या हॉटेलच्या प्रीमियम सुइट्सचे एका रात्रीचे भाडे सुमारे 9,100 युरो म्हणजेच भारतीय चलनात जवळपास 9 लाख रुपये इतके असल्याची माहिती आहे. त्यामुळे हे हॉटेल केवळ नेत्यांपुरते मर्यादित न राहता जागतिक उद्योगपती, सेलिब्रिटी आणि व्हीआयपी व्यक्तींची पहिली पसंती बनले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मुक्कामामुळे या हॉटेलची पुन्हा एकदा जागतिक स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *