पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – लेबरच्या कारणावरून वाद घालत एका तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली मारून गंभीर दुखापत केली. ही घटना दि. १९ जून रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील मौजे वासुली गावच्या हद्दीतील सुंदबन हॉटेल येथे घडली.
संदीप वाबळे आणि विजय कांबळे (पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अक्षय दिनकर भोगाडे (वय ३०, रा. खरपुडी बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे) यांनी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी अक्षय यांच्याशी लेबरच्या कामावरून वाद उकरून काढला. हा वाद वाढल्याने आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात बिअरची बाटली मारली, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला व कानाला गंभीर दुखापत झाली. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहे.
लेबरच्या वादातून बिअरच्या बाटलीने मारहाण
