Mumbai-रेवती सुळे विवाहबद्ध; राजकीय नेते आणि बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचा विवाह सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
या विवाह सोहळ्याला विविध पक्षांतील अनेक राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांनी उपस्थिती लावत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. राज्याच्या राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली.
याशिवाय बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. विवाह सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या सोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.