pimpri chinchwad-चिंचवडमधील एकाची ११ लाखांची ऑनलाइन फसवणूक

​पिंपरी, दि. २१ (pimpri chinchwad) – एका नागरिकाला एमएनजीएल गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचे भासवून, मोबाइल हॅक करत ११ लाख ३९ हजार ९९७ रुपयांची फसवणूक केली. ही घटना चिंचवड येथील गोखले वृंदावन सोसायटीत २६ एप्रिल रोजी घडली.
याप्रकरणी एका नागरिकाने शनिवारी (दि. २० जून) रोजी चिंचवड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार बँक खातेदारांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पुरुष फिर्यादीला अनोळखी इसमाने व्हॉट्सअँप कॉल केला व तो एमएनजीएल गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचे सांगितले. आरोपीने एक लिंक पाठवून फिर्यादीचा मोबाइल हॅक केला व बँक खात्यांची गोपनीय माहिती मिळवली. यानंतर फिर्यादीच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यांमधून एकूण ११ लाख ३९ हजार ९९७.५६ रुपये काढून घेण्यात आले. आरोपींमध्ये कॅनरा बँक, बिलडेस्क, रोझरपे व पेटीएम अकाऊंट धारकांचा समावेश आहे. चिंचवड पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *