Mumbai-१९वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उत्साहात संपन्न; ‘सिल्व्हर’ला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय माहितीपटाचा मान

मुंबई : माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांच्या उत्कृष्टतेचा गौरव करणारा १९वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (एमआयएफएफ २०२६) उत्साहात संपन्न झाला. जगभरातील दर्जेदार चित्रपटांना या महोत्सवात गौरविण्यात आले.

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय माहितीपटासाठीचा प्रतिष्ठेचा ‘गोल्डन कॉंच’ पुरस्कार पोलंडच्या ‘सिल्व्हर’ या माहितीपटाला प्रदान करण्यात आला. तर आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील ‘अंडर द स्नो’ (लघुकथा चित्रपट) आणि ‘मायाज साँग’ (अॅनिमेशन) या चित्रपटांनी ‘सिल्व्हर कॉंच’ पुरस्कार पटकावला.

राष्ट्रीय स्पर्धा विभागात ‘आर्मस्ट्राँग फ्रॉम अंगालम्मन टेंपल स्ट्रीट’ (अॅनिमेशन), ‘स्मॉल क्लाऊड्स’ (लघुकथा चित्रपट) आणि ‘वाई’ (माहितीपट) या चित्रपटांना ‘सिल्व्हर कॉंच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महोत्सवाने भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील नव्या प्रतिभांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *