पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – दोन देशी बनावटीचे गावठी कट्टे बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोन जणांना गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई २२ जून रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी करण्यात आली.
कमलाकर राजेंद्र साळवे (वय २०, रा. आंबेठाण, खेड, मूळ रा. अहिल्यानगर) व एक अल्पवयीन मुलगा अशी आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस शिपाई अमोल श्रीकांत वेताळ यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे भामचंद्र शाळेच्या पाठीमागील रोडवर संशयास्पद रित्या थांबले होते. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ८० हजार रुपये किमतीचे दोन देशी गावठी कट्टे मिळून आले. उत्तर महाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहे.
पिस्तुल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोघांना अटक
