गांजा विकणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई २२ जून रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द येथील पगडेवस्तीतील बैलगाडा घाटावर करण्यात आली.
नितीन मिथुन राजपूत (वय १८, रा. धानोरे, ता. खेड) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल नारायण धनाजी सूर्यवंशी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बैलगाडा घाट परिसरात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता, आरोपी राजपूत याच्या ताब्यातून १३ हजार ५०० रुपये किमतीचा २७२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. आळंदी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *