Dharashiv-ओमराजे निंबाळकरांच्या पक्षांतरावर मकरंदराजे निंबाळकरांची नाराजी; ‘पक्षाचा आदेश मिळाला तर रस्त्यावर उतरेन’

धाराशिव : खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मकरंदराजे निंबाळकर यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. ओमराजे यांनी पक्षांतराबाबत आपल्याशी चर्चा केली होती, मात्र हा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

मकरंदराजे निंबाळकर म्हणाले, “ओमराजे यांनी पक्षांतराबाबत माझ्यासोबत चर्चा केली होती. मात्र मला त्यांचा निर्णय पटला नाही. मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीतही आपण सहज निवडून येऊ, असेही मी त्यांना सांगितले. पण त्यांनी माझे ऐकले नाही.”

पुढे बोलताना त्यांनी पक्षनिष्ठेवर भर देत म्हटले की, “पक्षाचा आदेश मिळाला तर मी ओमराजेंच्या विरोधात रस्त्यावर उतरायलाही तयार आहे.”

ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेमुळे धाराशिवच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून त्यांच्या निर्णयावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. मकरंदराजे निंबाळकर यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणातील मतभेद अधिक स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे.

ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे आणि त्यावर पक्षाची भूमिका काय असेल, याकडे कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *