तीन पिस्तूल व ६ जिवंत काडतुसांसह आरोपीला अटक भोसरीत गुंडा विरोधी पथकाची मोठी कारवाई

​पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – गुंडा विरोधी पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या सराईताला अटक केली आहे. त्‍याच्‍याकडून तीन पिस्‍तूल व सहा जिवंत काडतूस हस्‍तगत करण्‍यात आली. ही कारवाई दि. २५ जून २०२६ रोजी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास धावडे वस्ती, भोसरी येथील गावजत्रा मैदानाजवळ करण्‍यात आली.
शब्बीर उर्फ मलीक जहाँगीर शेख (वय ३८, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार शुभम तानाजी कदम (वय ३४) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पोलीस सहआयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून विक्रीसाठी एक लाख ६६ हजार १०० रुपये किमतीची ३ लोखंडी पिस्तूल, ६ जिवंत काडतुसे, मोबाइल व सॅक बेकायदेशीरपणे जवळ बाळगली होती. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *