गावठी पिस्तूलासह तरुण ताब्यात

​पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – एका तरुणाकडून बेकायदा पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई २५ जून २०२६ रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास थेरगाव येथील रॉयल बँक्वेट हॉल समोर पवना नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्‍यात आली.
सोमीन अमिर खान (वय १८, रा. भोरडेनगर, थेरगाव, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आला आहे. पोलीस शिपाई अजय अरुण फल्ले यांनी काळेवाडी पोलीस ठाण्‍यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आपल्या ताब्यात विनापरवाना १ गावठी पिस्तूल आणि १ जिवंत काडतूस असे अग्निशस्त्र बाळगलेल्या स्थितीत मिळून आला. आरोपीने पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी व मनाई आदेशाचा भंग केला आहे. पुढील तपास काळेवाडी पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *