मुंबई(mumbai) : १ जुलै २०२६ पासून देशभरात अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर तसेच आर्थिक व्यवहारांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
बँकिंग सेवा, रेल्वे प्रवास, एलपीजी गॅस सिलिंडरचे दर, क्रेडिट कार्डचे नियम आणि इतर अनेक आर्थिक सेवांमध्ये सुधारित नियम लागू होणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी हे बदल आधीच जाणून घेणे आवश्यक ठरणार आहे.
दर महिन्याच्या सुरुवातीला इंधन आणि एलपीजीच्या किमतींसह विविध आर्थिक नियमांमध्ये बदल केले जातात. यावेळीही काही महत्त्वाचे निर्णय लागू होणार असून, त्याचा परिणाम लाखो ग्राहकांवर होईल.
१ जुलैपासून लागू होणाऱ्या नव्या नियमांमुळे कोणत्या सेवांमध्ये काय बदल होणार आणि त्याचा नागरिकांवर नेमका कसा परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
