पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – दोन मुलींची छेड काढल्याची खोटी तक्रार करण्याची धमकी देऊन एका हॉटेल व्यावसायिकाला बेदम मारहाण करत ५५ हजार ९५० रुपयांची खंडणी उकळली. तसेच दुचाकीही जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना २० मे ते २५ जून दरम्यान वाकी खुर्द येथे घडली.
सनी वैजीनाथ उघडे (वय १९), अनिकेत पुरुषोत्तम ढोले (वय २१), रवी संतोष परघरमोल (वय १८) आणि प्रेम गिरीष अंकुश (वय २१, चौघेही रा. राजगुरूनगर) यांना अटक करण्यात आली आहे. दामोदर अंगद यादव (वय ३६, रा. वाकी खुर्द, मूळ बीड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला धमकावून हॉटेलचे बिल भरायला लावले आणि रिक्षातून पळवून नेऊन बेल्टने बेदम मारहाण केली. धारदार शस्त्राचा धाक दाखवून रोख व ऑनलाइन स्वरूपात खंडणी घेतली. चाकण उत्तर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
—
दोन लाखांच्या खंडणीसाठी हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करून मारहाण
