पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – गावठी हातभट्टीची दारू विकणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या दारूबंदी पथकाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई चिंचवड येथील गुरुद्वारा रोडवरील मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे २६ जून रोजी करण्यात आली.
शुभम गोपी ठाकूर (वय १९, रा. चिंचवड) आणि दारू पुरवणारा गोपी जहरसिंग ठाकूर यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई अमोल सर्जेराव शिरसट यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सात हजार ५०० रुपये किमतीची गावठी हातभट्टीची तयार दारू चोरून विकत असताना आढळला. चिंचवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
चिंचवडमध्ये हातभट्टी दारू विक्री प्रकरणी कारवाई
