पिस्तुल बाळगणारा अल्‍पवयीन बालक ताब्यात

​पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – एका अल्पवयीन मुलाला देशी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसांसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रोहकल गावच्या रोडावर डायमंड चौकापुढे २६ जून रोजी करण्‍यात आली.
एका अल्‍पवयीन बालकावर शस्त्र अधिनियम कायद्यान्‍वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस शिपाई शिवाजी दत्तात्रय लोखंडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाकडे ५२ हजार रुपये किमतीचे विनापरवाना पिस्‍तूल मिळून आले. चाकण उत्तर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *