कोयता बाळगणाऱ्या आरोपीला अटक

​पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने घातक कोयता बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई दि. २८ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जुनी सांगवी येथील दत्त आश्रम मठासमोरील मोकळ्या जागेत करण्यात आली.
गणेश बालाकृष्णा पडाची (वय ३६, रा. लक्ष्मी नगर, पिंपळे गुरव) असे पोलिसांनी अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई निलेश किसन शिंगोटे यांनी सांगवी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे. या आदेशाचा भंग करून आरोपी गणेश हा आपल्या ताब्यात कोयता बाळगताना मिळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *