पिस्टलसह अल्‍पवयीन बालक मुलगा ताब्यात

पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला बेकायदेशीरपणे घातक हत्यार बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई दि. २८ जून रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास करण्यात भोसरी एमआयडीसी परिसरातील शिर्के कन्स्ट्रक्शन लेबर कॅम्पजवळ करण्‍यात आली.
​या प्रकरणातील आरोपी एक अल्पवयीन मुलाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला असून पोलिसांनी त्‍याला नोटीस बजावली आहे. पोलीस हवालदार बाजीराव भगवान सानप (वय ३८) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रांती चौकाकडून पंतप्रधान आवास योजनेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला अल्‍पवयीन मुलगा संशयास्पदरीत्या मिळून आला. त्याच्या झडतीत ४० हजार ५०० रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत राऊंड जप्त करण्यात आले. पोलीस सहआयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई झाली. या गुन्ह्याचा पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *