अज्ञात दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

​पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – रस्ता ओलांडत असलेल्या एका पादचाऱ्याला अज्ञात दुचाकीस्वाराने जोरात धडक दिली. या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात २८ जून रोजी रात्री आठच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे धन्वंतरी हॉस्पिटल समोर घडला.
अज्ञात मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नरेंद्र रघुनाथ जोशी (वय ५८, रा. काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे भाऊ तळेगाव बाजूकडून चाकण बाजूकडे रोड क्रॉस करत होते. त्यावेळी अज्ञात दुचाकी चालकाने आपले वाहन हयगयीने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून त्यांना धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *