जमीनच्‍या वादातून दगडाने मारहाण

पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – जुन्या वादातून आणि जमीन खरेदी-विक्रीच्या एजन्सीच्या कारणावरून एका व्यक्तीला आणि त्यांच्या सासऱ्यांना दगडाने मारहाण केली. ही घटना २८ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बावधनमधील जिजाई कॅफे जवळील मोकळ्या जागेत ही घटना घडली.
सुनील ऊर्फ बंडू विष्णू जोरी (वय ४०, रा. वारजे, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी विजय किसन जोरी (वय ३९, रा. कोथरूड, पुणे. मूळगाव- भादस, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्य आणि जमिनीच्या व्यवहारातील वादावरून आरोपीने फिर्यादी विजय आणि त्यांचे सासरे अनिल हिरामण लवारडे यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि डोक्यात दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. या गुन्ह्याचा पुढील तपास बावधन पोलीस ठाणे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *