दोन सराईत गुन्हेगार पिस्टलसह जेरबंद

पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – गुन्हे शाखेने कारवाई करत दोन जणांना घातक अग्निशस्त्रांसह अटक केली. ही कारवाई २९ जून रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास तळेगाव ते देहूरोड जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेल न्यू डायमंड समोर सोमाटणे फाटा येथे करण्‍यात आली.
​पप्पू उर्फ विनोद राकेश पवार (वय २६) आणि रोहन सीताराम सावंत (वय २४, दोन्ही रा. दत्तनगर, चिंचवड) यांना अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस शिपाई अजिनाथ राणे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही आरोपी बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगून फिरत होते. संशयावरून त्यांची झडती घेतली असता दोघांकडेही प्रत्‍येकी एक पिस्टल व एक काडतूस मिळून आले. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *