वी दिल्ली(delhi) : २०१३ मधील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू यांना सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ दिलासा देण्यास नकार दिला आहे. वैद्यकीय कारणास्तव दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने राजस्थान सरकारला नोटीस बजावत उत्तर मागवले आहे.
न्यायालयाने स्पष्ट केले की, राज्य सरकारची बाजू ऐकल्याशिवाय जामीन मंजूर केला जाणार नाही. मात्र, भविष्यात आसाराम बापू यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची झाली किंवा जीवाला धोका निर्माण झाल्यास वैद्यकीय कारणांवर जामिनाच्या मागणीचा विचार केला जाऊ शकतो, असेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिकेवर (SLP) सुनावणीसाठी नोटीस जारी केली असून, राजस्थान सरकारला तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
