पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई ३० जून २०२६ रोजी संध्याकाळी मुळशी तालुक्यातील सुस येथील सनिज वर्ल्ड समोरील रस्त्यावर करण्यात आली.
आकाश दयानंद गायकवाड (वय २२, रा. सुसगाव, ता. मुळशी, जि. पुणे) याला अटक केली आहे. पोलीस हवाल्दार अरुणे पांडुरंग नरळे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश लागू असताना आरोपी ६१ हजार रुपये किमतीचे एक देशी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगून फिरत होता. त्याने पोलीस आयुक्तांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले आहे. बावधन पोलीस पुढील तपास करीत आहे.
—
सुसगावमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल जप्त
