भांबोलीत अवैध देशी दारू जप्त; तरुण जेरबंद

पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – एका मोकळ्या जागेत अवैधरित्या व विनापरवाना देशी दारूची विक्री करण्यासाठी साठा बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई २९ जून २०२६ रोजी रात्री खेड तालुक्यातील भांबोली गावाच्या हद्दीत करण्यात आली.
विश्वजीत बिपीन कुमार महीलांगे (वय १९, रा. भांबोली, ता. खेड, जि. पुणे) याला अटक केली आहे. पोलीस शिपाई रामहरी महादेव शिंदे (वय ३५) यांनी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दोस्ती चायनीज हॉटेलच्या बाजूला ५ हजार ५६० रुपये किमतीच्या देशी दारूच्या एकूण ८८ बाटल्या विक्रीसाठी बेकायदेशीरपणे बाळगून होता. उत्तर महाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *