गोनवडीमध्‍ये दारू विकणारा पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – गावठी हातभट्टी दारूची अवैध विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई ३० जून २०२६ रोजी दुपारी गोनवडी गावाच्या हद्दीतील नदीकाठी स्मशानभूमीजवळील मोकळ्या जागेत करण्यात आली.
जीवन मारुती राजपुत (वय ४८, रा. गोनवडी, ता. खेड, जि. पुणे) याला अटक केली आहे. पोलीस अंमलदार मंगेश देवराम कदम यांनी उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सतराशे रुपये किमतीची १७ लिटर तयार गावठी हातभट्टी दारू बेकायदेशीर रित्या ताब्यात बाळगून विक्री करत होता. उत्तर महाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *