पिंपरी, दि. 2 (प्रतिनिधी) – खराबवाडी येथील ज्ञानवर्धिनी शाळेकडे जाणार्या रोडवरील मोकळ्या जागेत गांजा विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 4 ने एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई 30 जून रोजी रात्री करण्यात आली.
पवनकुमार संजय साह (वय 20, रा. खराबवाडी, मूळ रा. बिहार) याला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट 4 चे पोलीस शिपाई शेखर रोहीदास खराडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवनकुमार याच्याकडून 52 हजार 350 रुपये किमतीचा 1 किलो 47 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तो हा माल बेकायदेशीर विक्रीसाठी घेऊन आला होता. याप्रकरणी दक्षिण महांळुगे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सव्वा किलो गांजासह परप्रांतीय तरुण पोलिसांच्या जाळ्यात
