कामगाराच्या मृत्यू प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी, दि. 2 (प्रतिनिधी) – एका स्टॅम्पिंग कंपनीत तांत्रिक ज्ञान नसतानाही हेल्परला प्रेस शॉप मशीनवर काम करायला लावल्याने मशीनचा लोखंडी जॉब उडून गळ्याला लागून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना 1 जुलै रोजी भोसरी येथे घडली.
लेबर कॉन्ट्रॅक्टर दीपक शिवाजी राळे (वय 28), संदेश प्रभुराव पांडे (वय 52, दोघेही रा. वडमुखवाडी), सुपरवायझर बाळाजी पंढरीनाथ आलुरे (वय 46, रा. मोशी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बुंदेला रामधुज निशाद (वय 23, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या 12 वी पास भावाला तांत्रिक ज्ञान नसतानाही मशीनवर काम करण्यास भाग पाडल्यामुळे लोखंडी जॉब उडून गळ्याला लागल्याने हा अपघात घडला व त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *