गावठी कट्ट्यासह एक जण ताब्‍यात

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका चोवीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई भामचंद्र डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर २ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली आहे.
कुणाल गणपत जगताप (वय २३, रा. वडगाव मावळ, मूळ रा. टाकवे बुद्रुक, मावळ) याला अटक केली आहे. पोलीस शिपाई गणेश राजेंद्र गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुणाल जगताप हा दास कंपनीच्या बाजूला रोडवर संशयास्पद रित्या थांबला होता. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे बेकायदेशीरपणे बाळगलेला २५ हजार रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि ५०० रुपयांचे जिवंत काडतूस मिळून आले. पुढील तपास उत्तर म्हाळुंगे पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *