Mumbai-राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहारावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा; ‘अयोध्येत हे होत असेल तर काशी-मथुरेचं काय?’

मुंबई : अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. “राम मंदिरातील दान चोरी ही जर अयोध्येची झांकी असेल, तर काशी आणि मथुरेत किती लूट होईल?” असा सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरासारख्या श्रद्धास्थानाशी संबंधित आर्थिक व्यवहारांमध्ये पूर्ण पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचे सांगत, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तसेच धार्मिक भावनांचा वापर राजकारणासाठी केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.

राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांवरून सध्या राजकीय वातावरण तापले असून, विविध पक्षांकडून सरकार आणि संबंधित ट्रस्टच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर या वादाला आणखी धार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *