वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्ययात्रेदरम्यान “एका फटक्यात इराणच्या उर्वरित संपूर्ण नेतृत्वाचा खात्मा करू शकलो असतो,” असा दावा ट्रम्प यांनी केला.
मात्र, असे पाऊल आपण उचलले नाही, कारण त्यानंतर चर्चा करण्यासाठी कोणीच उरणार नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले. “मी तसे केले नाही, कारण मग वाटाघाटी कोणाशी करणार?” असे ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या चर्चांना उधाण येण्याची शक्यता असून, अमेरिका-इराण संबंधांबाबत पुन्हा तणाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
