पुणे : राज्यात दूध भेसळ करणाऱ्या माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली असून, अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत पाच जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईत 13 जणांना अटक करण्यात आली आहे.
ही मोहीम तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली असून, राज्यातील दूध भेसळ रॅकेटचा मोठा पर्दाफाश करण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दूध भेसळीसारख्या गंभीर प्रकारांवर कठोर कारवाई करत ग्राहकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबविण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून, आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
