पुणे : नागपुरातील धंतोली परिसरातून एकाच कुटुंबातील पाच सदस्य बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कुटुंबीयांकडून आणि पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता कुटुंबातील सदस्यांचे शेवटचे लोकेशन पुण्यात आढळून आले आहे. त्यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.
या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी नागपूर आणि पुणे पोलिसांच्या पथकांकडून समन्वय साधून तपास सुरू आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांचा माग काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, पोलिसांकडून लवकरच याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
