Mumbai-मुंबईतील मुसळधार पाऊस, दिल्लीतील खराब हवामान; एअर इंडियाचे प्रवाशांना महत्त्वाचे आवाहन

मुंबई(mumbai) : मुंबईतील मुसळधार पाऊस आणि दिल्लीतील प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या फ्लाइटचे अद्ययावत वेळापत्रक आणि स्टेटस तपासूनच प्रवासासाठी निघावे, असे आवाहन कंपनीने केले आहे.

प्रतिकूल हवामानामुळे काही उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल होण्याची किंवा विलंब होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी एअर इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाइल अॅपवर फ्लाइटची स्थिती तपासावी, असेही कंपनीने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *