Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Uncategorized

राज्यातील मागासवर्गीय समाजावरील वाढते अत्याचार अत्यंत चिंताजनक; आमदार अमित गोरखे यांनी पावसाळी अधिवेशनात वेधले सरकारचे लक्ष दोषींवर कठोर कारवाई करा – आमदार अमित गोरखे यांची मागणी

By Sumedh Chapalgaonkar
July 10, 2026 2 Min Read
0

मुंबई, ०९ जुलै २०२६ : राज्यात मागासवर्गीय समाजावरील सातत्याने वाढत चाललेल्या अत्याचारांच्या अत्यंत गंभीर आणि अमानुष घटनांवर आज विधिमंडळात भाजप आमदार अमित गोरखे यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ द्वारे सरकारचे लक्ष वेधले. जळगाव, बीड, सोलापूर आणि माळशिरस येथे घडलेल्या सलग घटनांनी राज्यातील मागासवर्गीय समाजाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केला असून, सरकारने यावर तात्काळ भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी आज सभागृहात केली.

मागासवर्गीय समाजावर अत्याचार
सभागृहाचे लक्ष वेधताना आमदार अमित गोरखे यांनी राज्यातील घटना सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या. जळगावमध्ये मार्च महिन्यात एका मागासवर्गीय युवकाने उच्चजातीय मुलीशी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून त्याला नग्न करून लोखंडी रॉडने अत्यंत निर्घृणपणे मारहाण करण्यात आली. बीड शहरात मे २०२६ मध्ये मागासवर्गीय समाजातील युवक उमेश दळवी यांची अमानुष मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली. नुकतेच सोलापूर जिल्ह्यात मागासवर्गीय चौंडेश्वरवाडी या गावात दिवसाढवळ्या शेतकरी महिला उषा विजय साठे यांची शेतात काम करत असताना सचिन देशमुख नावाच्या व्यक्तीने गोळी झाडून हत्या केली. इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे एका १६ वर्षीय मागासवर्गीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली.

आमदार अमित गोरखे यांची प्रमुख भूमिका
या सर्व प्रकरणांतील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करून ‘अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत’ (Atrocity Act) प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. पीडित कुटुंबांना तात्काळ न्याय देऊन आवश्यक ती आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी. मागासवर्गीय समाजात निर्माण झालेली भीतीची भावना दूर करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गृहविभागाने या संवेदनशील प्रकरणावर तात्काळ निवेदन करावे. कठोर कारवाईचे आदेश द्यावेत, अशी भूमिका आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात मांडली आहे.

मागासवर्गीय समाजाविरुद्ध असुरक्षिततेचे गंभीर चित्र
या सलग घडलेल्या घटना केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसून, मागासवर्गीय समाजाविरुद्ध वाढत्या जातीय मानसिकतेचे आणि असुरक्षिततेचे गंभीर चित्र अधोरेखित करणाऱ्या आहेत, असे प्रतिपादन आमदार अमित गोरखे यांनी केले. तसेच, या बीड प्रकरणांत पीआय शितलकुमार बल्लाळ यांच्याकडून झालेल्या गंभीर दप्तर दिरंगाईचा (निष्काळजीपणाचा) निषेध करत त्यांच्यावरही तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

‘मेक इन इंडिया’ जागतिक ब्रँड बनला; भारतात चिपपासून शिपपर्यंत संपूर्ण इकोसिस्टम उभी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Next

महाराष्ट्र ATSची राज्यभर धडक कारवाई; पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी सोशल मीडिया संपर्क प्रकरणाची चौकशी

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme