‘मेक इन इंडिया’ जागतिक ब्रँड बनला; भारतात चिपपासून शिपपर्यंत संपूर्ण इकोसिस्टम उभी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या १२ वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत भारताने उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठी झेप घेतल्याचा दावा केला. ‘मेक इन इंडिया’ आता केवळ एक सरकारी योजना नसून जागतिक स्तरावर ओळखला जाणारा ब्रँड बनल्याचे त्यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी म्हणाले, “आतापर्यंतच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात ‘मेक इन इंडिया’चा विकास होऊन तो एक ‘जागतिक ब्रँड’ बनला आहे. चिपपासून ते शिपपर्यंत संपूर्ण इकोसिस्टम भारतात तयार झाली आहे. ‘नागरिक देवो भव:’ हा प्रशासनाचा मंत्र बनला आहे.”

यावेळी त्यांनी भारतातील उत्पादन क्षेत्राच्या वाढीवर प्रकाश टाकत मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन उद्योग आणि औषधनिर्माण क्षेत्रातील उत्पादनांनी जागतिक बाजारपेठेत आपली मजबूत ओळख निर्माण केल्याचे नमूद केले. भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून उत्पादन आणि निर्यात क्षमतेत सातत्याने वाढ होत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *