पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी कथित सोशल मीडिया संपर्क प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) राज्यभरातील विविध ठिकाणी धडक छापेमारी केली आहे. या कारवाईमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या तपासात १५० हून अधिक व्यक्ती तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे झालेल्या संपर्कांचे स्वरूप, त्यामागील उद्देश आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने त्याचे परिणाम यांचा ATS आणि इतर केंद्रीय यंत्रणा बारकाईने तपास करत आहेत.
या प्रकरणात संशयितांच्या डिजिटल व्यवहारांची, सोशल मीडिया अकाउंट्सची आणि संपर्क साखळीची पडताळणी सुरू असून, पुढील चौकशीनंतर आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
