Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकाचा मृत्यू दुर्घटनेतील एकूण मृतांची संख्या ९ वर; शोधमोहीम पूर्ण झाल्याने बचावकार्य थांबविण्यात आले

By Sumedh Chapalgaonkar
July 12, 2026 3 Min Read
0

पिंपरी, दि. १२ जुलै २०२६ : मोशी कचरा डेपो येथे झालेल्या दुर्घटनेत चौथ्या दिवशीच्या शोधमोहीमेत दुर्घटनाग्रस्त इमारतीत अडकलेल्या ७ नागरिकांच्या मृत्यूसह इमारतीशेजारील ढिगाऱ्याखाली मध्यरात्री १ वाजता आढळून आलेल्या वामन कसबे (वय ५०, मोशी) या नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या ९ इतकी झाली असून या दुर्घटनेतील सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्याने बचावकार्य थांबविण्यात आले आहे.

८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास मोशी कचरा डेपो येथे इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीत व इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, भारतीय सेना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. घटना घडल्यानंतर लागलीच पाच नागरिक स्वतः बाहेर आले होते. उर्वरित १८ नागरिकांपैकी ९ नागरिकांना दुर्घटनाग्रस्त इमारतीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. तब्बल ८४ तास अविरत चाललेल्या या बचावमोहीमेतील शोधकार्यामध्ये चौथ्या दिवशी इमारतीत अडकलेल्या ७ आणि इमारतीशेजारील ढिगाऱ्यात अडकलेल्या १ अशा ८ व्यक्तींचा मृत्यू झाला. तर इमारतीत अडकलेल्या भावेश वाणी यांचा ९ जुलै रोजी मृत्यू झाला होता. बचावकार्याच्या चौथ्या दिवशी अक्षय सावंत (वय ३५, मोशी), सुनील कोरके (वय ४०, आळंदी), सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (वय २२, मोशी) तसेच राहुल गायकवाड (वय ३४, मोशी) यांचा मृत्यू झाला.

एक नागरिक इमारतीशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकून पडल्याने त्याठिकाणी निरंतर शोधमोहीम सुरू होती. अखेर चौथ्या दिवशी मध्यरात्री १ वाजता वामन कसबे (वय ५०, मोशी) यांचा शोध लागला. त्यांना तातडीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तपासणीअंती त्यांना मृत घोषित करण्यात आले.

संपूर्ण बचावकार्यादरम्यान आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून होते. दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये सुरक्षित प्रवेश करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत इमारतीच्या बाजूचा कचऱ्याचा ढीग वेगाने हटविल्यानंतर या इमारतीत प्रवेश करण्याचे सर्व बाजूंनी प्रयत्न करण्यात आले. इमारत अस्थिर असल्याने ती पूर्ण कोसळून आत अडकलेल्या जीवितांना धोका पोहोचू नये, याची काळजी घेऊन बचावकार्य राबविण्यात येत होते. इमारतीचा वरचा मजला हटविण्यासाठी दोन अत्याधुनिक डिमोलिशन एक्सकॅव्हेटर यंत्रे मागविण्यात आली. या यंत्रांच्या सहाय्याने इमारतीच्या वरच्या मजल्याचे काँक्रीट फोडून आत जाण्याचा मार्ग तयार करण्यात आला. चौथ्या दिवशी दुपारी २ वाजता इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात झाली. रात्री १० वाजेपर्यंत अडकलेल्या सर्व आठही नागरिकांना बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने या सर्वांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, इमारतीशेजारील ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकाचा शोध घेण्यासाठी सर्चिंग ऑपरेशन निरंतर सुरू होते. यासाठी एनडीआरएफच्या श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली. अखेर मध्यरात्री १ वाजता वामन कसबे यांचा शोध लागला. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील एकूण मृतांची संख्या ९ इतकी झाली आहे. या दुर्घटनेत अडकलेल्या सर्व नागरिकांचे शोधकार्य पूर्ण झाल्याने अखंडपणे तब्बल ८४ तास चाललेली ही बचावमोहीम मध्यरात्री २ वाजता थांबविण्यात आली.

कोट-
मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेत भावेश वाणी, अक्षय सावंत, सुनील कोरके, रणजीत पाटील, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, राहुल गायकवाड, वामन कसबे यांना आपला अमूल्य जीव गमवावा लागला. ही घटना मनाला अक्षरशः सुन्न करणारी आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी अत्यंत वेदनादायी आहे. मलब्याखाली अडकलेल्या प्रत्येक सहकाऱ्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, भारतीय सेनेचे जवान, पोलीस प्रशासन तसेच सर्व संबंधित विभागांनी रात्रंदिवस अथक परिश्रम घेतले. जीवाची बाजी लावत प्रत्येक जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, अखेर नियतीपुढे सारे प्रयत्न अपुरे ठरले. आज महापौर म्हणून नव्हे, तर एका सहकाऱ्याच्या आणि माणुसकीच्या नात्याने माझे मन अत्यंत व्यथित झाले आहे. आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी जीव गमावलेल्या या सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेले दुःख शब्दांत व्यक्त करता येत नाही. हा अत्यंत वेदनादायी प्रसंग असून दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.

-रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

कोट-
मोशी कचरा डेपो येथे घडलेली घटना दुर्दैवी असून यामध्ये ९ नागरिकांचा मृत्यू झाला. मनाला प्रचंड वेदना देणारी ही घटना आहे. यंत्रणांनी तब्बल ८४ तास सलग बचाव मोहीम राबविली. ९ नागरिकांना सुखरुप बाहेर देखील काढले. मात्र ९ नागरिकांचा झालेला अंत मन हेलावून टाकणारा आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

Thane-माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल; सुनेचे कौटुंबिक हिंसाचाराचे गंभीर आरोप

Next

जुन्या वादातून दोघांवर चाकूने जीवघेणा हल्ला

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme