मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे दिवसेंदिवस अधिक निष्पक्ष होत चालले असून ते सर्वांचेच नेते असल्याचे राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत म्हणाले, “पवार साहेब सगळ्यांचे आहेत. ते सध्या तटस्थ भूमिका बजावत आहेत. ते आमचे मार्गदर्शक आहेत. महाविकास आघाडीला ते कधीही सोडून वेगळा विचार करणार नाहीत. त्यांची विचारधारा वेगळी असून ते संपूर्ण महाराष्ट्राला सोबत घेऊन चालणारे नेते आहेत.”
शरद पवार यांच्या भूमिकेबाबत विविध राजकीय तर्क-वितर्क सुरू असताना संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत कोणतीही दुरावस्था नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
