Thane-सूनेच्या आरोपांनंतर विनायक राऊत अडचणीत; लेकासह कुटुंबावर गुन्हा, पोलिसांनीही सुरक्षा काढली

ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. सून गिरीजा राऊत यांनी केलेल्या कौटुंबिक छळ आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रारीनंतर विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि कुटुंबीयांविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली असून, विनायक राऊत यांनी मागितलेले पोलिस संरक्षण नाकारण्यात आले आहे. तसेच यापूर्वी उपलब्ध असलेले पोलिस संरक्षणही काढून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राऊत कुटुंबाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

गिरीजा राऊत यांनी पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ झाल्याचा आरोप केला असून, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गतही गंभीर आरोप केले आहेत. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

या प्रकरणावर विनायक राऊत यांची भूमिका आणि पोलिस तपासाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, या घडामोडींमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातही चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *