Mumbai –सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय; लढणारे लोक नकोत, संजय राऊतांचा केंद्रावर सडकून प्रहार

मुंबई : लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीवरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. “सोनम वांगचूक शरीराने कोसळले आहेत. सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले की, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या व्यक्तींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. संवाद साधण्याऐवजी आंदोलनकर्त्यांना दुर्लक्षित करण्याची भूमिका सरकार घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशासाठी लढणाऱ्या आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्यांना न्याय मिळायला हवा, असेही ते म्हणाले.

सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा करावी, अशी मागणीही राऊत यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *