नवी सांगवीत अल्‍पवयीन मुलाला बेदम मारहाण

पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – रस्ता ओलांडणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याला भरधाव दुचाकीचा धक्का लागला. याचा जाब विचारताच दोन जणांनी त्‍यास बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. १२ जुलै) रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्‍या सुमारास घडली.
सिद्धार्थ कांबळे व आयुष वाल्मिकी (दोघेही रा. पिंपळे गुरव) अशी गुन्‍हा दाखल केलेल्‍या आरोपींची नावे आहेत. हर्षवर्धन निशांत काळे (वय १७, रा. विद्यानगर, नवी सांगवी) यांनी सोमवारी (दि. १३ जुलै) रोजी सांगवी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोसिलांनी दिलेल्‍या माहितीनुसार, दुचाकीवरील आरोपी भरधाव वेगात गाडी चालवत असताना त्‍याचा धक्‍का फिर्यादी यांनाल लागला. याबाबत त्‍याने जाब विचारला असता आरोपींनी त्‍यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आयुषने हातातील स्टीलच्या कड्याने विद्यार्थ्याच्या डाव्या डोळ्याजवळ व गालावर मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याचा चष्माही फुटला. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *