नेतन्याहूंच्या अटकेच्या वक्तव्यावर ट्रम्प यांचा पलटवार; “अमेरिकेच्या भूमीवर कोणतीही अटक होणार नाही”
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अमेरिकेत आल्यास त्यांना अटक होऊ शकते, असे वक्तव्य केल्यानंतर या मुद्द्यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देत, “अमेरिकेच्या भूमीवर नेतन्याहू यांना अटक केली जाणार नाही,” असे सांगितले.
दरम्यान, इस्रायलनेही आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या (ICC) अटक वॉरंटला बेकायदेशीर ठरवत ममदानी यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
या घडामोडींमुळे अमेरिका, इस्रायल आणि आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, या प्रकरणाकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले आहे.