नवी दिल्ली :
कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या प्रवक्त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.
NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ही भेट झाली. शिष्टमंडळाने परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत निवेदन सादर केल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, जंतर-मंतर परिसरात सुरू असलेल्या आंदोलनामुळे राजधानीतील राजकीय वातावरण तापले असून, या मुद्द्यावर सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चेची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
