Delhi-पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोदी निवासस्थानाबाहेर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस खासदारांचे धरणे आंदोलन

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात काँग्रेसच्या सरचिटणीस तथा खासदार प्रियांका गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक खासदार सहभागी झाले आहेत.

केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनस्थळी घोषणाबाजी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.

काँग्रेसकडून विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर केंद्र सरकारला लक्ष्य करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान निवासस्थानाबाहेर करण्यात आलेल्या या आंदोलनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *