बँक खात्याचा गैरवापर करून ऑनलाइन फसवणूक
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – बँक खात्याचा गैरवापर करत साथीदारांशी संगनमत करून एक लाख १० हजार रुपयांचा सायबर फसवणूक केली. ही घटना चिखली येथे २९ मार्च रोजी घडली.
रोहित ज्ञानेश्वर भानुसे (रा. नऱ्हे, पुणे; मूळगाव हिवरखेड पूर्णा, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस शिपाई आकाश ज्ञानेश्वर नायकोजी यांनी सोमवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने HDFC बँकेचे खाते उघडून आपल्या साथीदारांच्या मदतीने ३ नागरिकांची फसवणूक केली. सायबर गुन्ह्यातून आलेली एक १० हजार ३३४ रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यावर स्वीकारून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत.